नमस्कार ,

नीलम  माणगावे

प्रसिद्ध  मराठी  लेखिका

नीलम माणगावे या मराठीतील प्रतिथयश लेखिका आहेत. कथा, कविता, कादंबरी, लोकसाहित्य, आत्मकथन, सामाजिक, वैचारिक लेख, प्रवासानुभव, संपादन- समीक्षात्मक वगैरे साहित्य प्रकारामधून विपूल लेखन केलेले आहे. प्रौढसाहित्याबरोबर बालसाहित्यही लिहिले आहे. आजपर्यंत त्यांची ७३ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, मिळाला आहे. त्याशिवाय राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या कथा, कवितांचा समावेश झाला आहे त्याच्या साहित्यिक सेवेबद्‌द्‌ल अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्या प्रकाशित पुस्तकांना भेट दया.

काही मौलिक माहिती

करिअरची सुरुवात - वयाच्या ३९ व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. १ जून १९९३ रोजी पहिली कविता लिहिली. त्यानंतर मागे वळुन पाहिले नाही. लिहीत गेले. कविता, कथा, कादंबरी, ललित- वैचारिक लेख, सामाजिक, लोकसाहित्य, प्रवासानुभव, संपादकीय, समीक्षणात्मक, संपादन, संशोधन, आत्मकथन, माहितीपर वगैरे साहित्य प्रकारामधून लिहित गेले. बालसाहित्य आणि कुमारसाहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाट्यछटा, प्रवासानुभव लिहिले आहे. एकपात्री, दीर्घ कविता (गाथा उत्क्रांतीची), माहितीपर 'संविधान-ग्रेट भेट, पौगंडावस्थेतील मुलींसाठी प्रिय मुली आणि मुलांसाठी बेटा, हे तुझ्यासाठी अशी छोटे खानी पुस्तक लिहिली. कथा कशी लिहायची याचे मार्गदर्शन करण्यासाठी' कथा लिहायची ना ?.. चला' असे पुस्तक लिहिले. विज्ञान कथाही लिहिल्या. 'शोध' आणि 'मृत्युदंड' या दोन कादंबरीवर प्रा. कु. वनिता वामन उबाळे यांनी एम.फिल केले आहे .'जाग' आणि 'उद्ध्वस्तायन' कवितासंग्रहावर प्रा. लोहिता रेडेकर यांनी एम.फिल केले आहे.

नाव :
नीलम माणगावे
फोन :
९४२१२00४२१
करिअर सुरू झाले :
१९९३
देश :
भारत
जन्म :
१ मे १९५४
ई-मेल:
nilammangave@gmail.com
भाषा :
मराठी
पत्ता :
पत्ता-९'पालवी' विकास कॉलनी, १३ वी गल्ली, लक्ष्मी रोड, जयसिंगपूर (महाराष्ट्र) ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

अद्भुत संख्या

सर्व टप्पे गाठले

७३

एकूण पुस्तके

पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर

पुस्तके

नुकतीच प्रकाशित झालेली काही पुस्तके

कामगिरी

पुरस्कार मिळवले

पुस्तके

सर्वाधिक वाचली जाणारी पुस्तके

भैरवायन

संविधान ग्रेट भेट

कंदील काठी आणि तू

जसं घडलं तसं

अधिक माहिती साठी संपर्क करा

  पत्ता-९'पालवी' विकास कॉलनी, १३ वी गल्ली, लक्ष्मी रोड, जयसिंगपूर (महाराष्ट्र) ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
  nilammangave@gmail.com
  ९४२१२00४२१